'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा

उत्तर प्रदेश राज्यात २०१७ साली विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण जोमाने तयारीला लागल्याचं दिसत आहे.  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सभेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांची माहिती लोकांना घरोघरी जाऊन द्या आणि लोक ते सहन करतील का हे विचारा' असं वक्तव्य केलं आहे.

Updated: Feb 27, 2016, 10:35 AM IST
'जेएनयू वाद घराघरात पोहोचवा' - अमित शहा title=

लखनऊ : उत्तर प्रदेश राज्यात २०१७ साली विधानसभेच्या निवडणूका आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण जोमाने तयारीला लागल्याचं दिसत आहे.  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एका सभेत भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांची माहिती लोकांना घरोघरी जाऊन द्या आणि लोक ते सहन करतील का हे विचारा' असं वक्तव्य केलं आहे.

"'अफजल हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है'; 'भारत तेरी बरबादी तक जंग जारी रहेगी'; 'भारत तेरे टुकडे होंगे'; 'हर घर में अफजल पैदा होगा' या भारतविरोधी घोषणा आहेत, की नाहीत, हे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट करावे," असेही ते म्हणाले.

या घोषणा देशविरोधी आहेत की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहेत हे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी राहुल गांधींना दिले. माध्यमातल्या लोकांनीही राहुल गांधींना हा प्रश्न वारंवार विचारावा, अशी विनंती त्यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना केली.