संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडूंनी अखेर हात जोडले

गेले तीन आठवडे संसदेतील कोंडी फुटत नसल्याने सत्ताधारी भाजप सरकारमधील मंत्र्यांना हात जोडावे लागले. ललित मोदी, व्यापमं घोटाळा प्रकरणी विरोधकांनी संसदेत रान उठवून दिले. त्यामुळे भाजप सरकार कोंडीत सापडले. लोकसभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तर राज्यसभेत व्यंकय्या नायडूंनी हात जोडलेत.

Updated: Aug 12, 2015, 01:45 PM IST
संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडूंनी अखेर हात जोडले title=

नवी दिल्ली : गेले तीन आठवडे संसदेतील कोंडी फुटत नसल्याने सत्ताधारी भाजप सरकारमधील मंत्र्यांना हात जोडावे लागले. ललित मोदी, व्यापमं घोटाळा प्रकरणी विरोधकांनी संसदेत रान उठवून दिले. त्यामुळे भाजप सरकार कोंडीत सापडले. लोकसभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तर राज्यसभेत व्यंकय्या नायडूंनी हात जोडलेत.

 संसदेत व्यापमं घोटाळा व ललित मोदी प्रकरणावरून पावसाळी अधिवेशानात काँग्रेसने जोरदार हंगामा केला. ललित मोदी प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस केली. मात्र, सरकारकडून स्वराज यांची पाठराखण केल्याने काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला. त्यामुळे काँग्रेसच्या गोंधळी २५ खासदारांना निलंबित केले गेले. यानंतर सर्वच विरोधक एकत्र आलेत. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली. ही कोंडी कायम होती. अधिवेशन संपण्याच्या आठवडा संपण्या आधी सत्ताधाऱ्यांनी दोन पावले मागे यावे लागले.

आपण कोणत्याही चर्चेस तयार असल्याचे सांगत  केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर हात जोडत मल्लिकार्जुन खर्गेंचा तहकूबीचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली. व्यापमं घोटाळा व ललित मोदी प्रकरणावरून पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात तरी थोडे कामकाज व्हावे या हेतूने सरकारने या विषयावर चर्चेस तयारी दर्शवली. मात्र, प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून तातडीने या विषयावर चर्चा घेण्याची काँग्रेस सदस्यांची मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावल्याने काँग्रेस सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजीस सुरुवात केली.

काँग्रेसने लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. कामकाज सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकुबीचे प्रस्ताव फेटाळून लावले. मात्र परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निवेदन करत मल्लिकार्जुन खर्गेंचा प्रस्ताव स्वीकारून चर्चा सुरू करावी, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांना केली.

सरकारने चर्चेस तयारी दाखविल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात बोलावण्याची मागणी केली. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत चर्चा कशी होणार, असे विचारत आरोप असलेल्यांनीच खुलासा करणे आम्हाला मंजूर नाही, असे खर्गे म्हणाले. मात्र  प्रश्नोत्तराच्या तासानंतरच चर्चा घेण्यात येईल, असे सुमित्रा महाजन यांनी  स्पष्ट केले. 

दरम्यान, केंद्राचे महत्वाचे जीएसटी विधेयक पारित होण्यात अनेक अडचणी आल्याने व्यंकय्या नायडूंनीही राज्यसभेत हात जोडलेत. हे विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती विरोधकांना केली. काँग्रेससह, डाव्या पक्षांना माझी विनंती आहे ती जीएसटी विधेयक मंजूर करण्यास सहकार्य करावे, असे ते म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.