आता वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना मिळेल कन्फर्म तिकीट

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण रेल्वेचं तिकीट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्म नसेल, वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर आता प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता त्यांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

Updated: Aug 12, 2015, 12:31 PM IST
आता वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना मिळेल कन्फर्म तिकीट title=

नवी दिल्ली: रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण रेल्वेचं तिकीट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्म नसेल, वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर आता प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता त्यांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे.

इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलेल्या बातमीनुसार ज्या रेल्वे प्रवाशांचं वेटिंगमध्ये नाव असेल त्यांच्यासाठी खास बॅकअॅप रेल्वे चालविण्याची योजना आहे. या योजनेवर काम सुरू असून ज्या प्रवाशांचं तिकीट कन्फर्म झालेलं नसेल त्यांना त्याच रूटवरील दुसऱ्या ट्रेननं प्रवास करता येईल. या ट्रेनमध्ये वेटिंग तिकीटच मान्य असेल. सोबतच प्रवाशांकडे पास तिकीट रद्द करण्याची आणि रिफंडची सुविधा असेल.

रेल्वे बोर्डाचे अतिरिक्त महानिदेशक अनिल कुमार सक्सेना यांच्या मते वेटिंग तिकीट असलेल्या सर्व प्रवाशांना कन्फर्म बर्थ मिळण्यासाठी ऑप्शनल ट्रेननं प्रवास करण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे. ते म्हणाले, काही ट्रेन नेहमी फुल्ल असतात, अशा ट्रेन्समध्ये वेटिंग लिस्टही खूप मोठी असते. 

या प्रस्तावाअंतर्गत या ट्रेन्सना अमुक एका ट्रेनच्या मागे चालवलं जाईल. म्हणजे ज्या प्रवाशांचं तिकीट कन्फर्म झालं नाही, त्यांना लगेच दुसऱ्या ट्रेननं जायला मिळेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.