'ग्लोबल थिंकर्स'च्या यादीत सुषमा स्वराज यांना मानाचं स्थान

२०१६ ग्लोबल थिंकर्सच्या यादीमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना स्थान देण्यात आलंय.

Updated: Dec 14, 2016, 12:53 PM IST
'ग्लोबल थिंकर्स'च्या यादीत सुषमा स्वराज यांना मानाचं स्थान title=

नवी दिल्ली : २०१६ ग्लोबल थिंकर्सच्या यादीमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना स्थान देण्यात आलंय.

स्वराज यांनी 'डिसिजन मेकर्स'च्या श्रेणीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन, संयुक्त राष्ट्राच्या महासचिव बान की मून, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल आणि अमेरिकेच्या अॅटर्नी जनरल लॉरेटा लिंच यांच्यासह स्थान मिळवलंय.

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरचा त्यांनी योग्य वापर केल्यानं त्यांचा सन्मान करण्यात आलाय. 

येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यापासून ते पासपोर्टमध्ये केलेल्या बदलांसाठी त्यांनी ट्विटरचा वापर आक्रमकपणे केला होता. त्यामुळे सुषमा स्वराज यांना 'कॉमन ट्विपल्स लीडर'चा किताबही देण्यात आलाय.