दिल्ली : परदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान यांच्या वायफळ बडबडीला सडेतोड उत्तर दिलंय.
काश्मीरला पाकिस्तानचा भाग बनवण्याचं नवाज शरीफ यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं स्वराज यांनी शरीफांना ठणकावून सांगितलंय. नवाज शरीफ यांच्या या वक्तव्याने हे तर स्पष्टच झालंय की काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानच्या 'नापाक' हालचाली सुरू आहेत, याकडेही स्वराज यांनी लक्ष वेधलं.
पाकिस्ताननं काश्मीरसाठी कधीच शुभवार्ता आणलेली नाही... केवळ हिंसा आणि दहशतवादला प्रोत्साहन दिलंय. बुरहान वाणी हा एक कुख्यात दहशतवादी होता. काश्मीरला हडपण्याचं पाकिस्तानचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. काश्मीर भारताचा भाग आहे आणि राहणार, असं प्रत्यू्त्तर स्वराज यांनी दिलंय.
#WATCH: External Affairs Minister Sushma Swaraj speaks on Pakistan and Pakistan PM Nawaz Sharif.https://t.co/yTZcNXqk3v
— ANI (@ANI_news) July 23, 2016