कनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया...

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली. 

Updated: Aug 6, 2015, 01:57 PM IST
कनवाळू सुषमांना आली मोदीच्या कॅन्सर पीडित पत्नीची दया... title=

नवी दिल्ली : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांच्या टीकेचं लक्ष ठरलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत आपली बाजू मांडली. 

ललित मोदी यांना व्हिसा देण्यासाठी मी ब्रिटिश सरकारला कोणत्याही प्रकारे विनंती केली नव्हती... हा आरोपच मुळात चुकीचा आणि असत्य आहे आहे. असा आरोप करणाऱ्यांना मी आव्हान देतेय की एकही असा पुरावा, पत्र, ईमेल मला दाखवा ज्याद्वारे मी ब्रिटिश सरकारकडे ललित मोदीसाठी शिफारस करतेय असं सिद्ध होऊ शकेल, असं सुषमा स्वराज यांनी गुरुवारी लोकसभेत उसणं अवसान आणत म्हटलंय. 

यावेळी, ललित मोदी यांच्या पत्नीनं लिहिलेलं एक पत्रही सुषमा स्वराज यांनी संसदेत वाचून दाखवलं. कनवाळू सुषमा स्वराज यांना मोदींच्या पत्नीची दया आल्याचंही यावरून दिसत होतं.
 
जर एका कॅन्सर पीडित महिलेला मदत करणं हा गुन्हा असेल तर मी संपूर्ण देशासमोर माझा गुन्हा कबूल करतेय... आणि यासाठी सदन मला जी शिक्षा देईल ती भोगण्यासाठी मी तयार असेन... जर सोनिया गांधी माझ्या जागेवर असत्या तर त्यांनी एका कँन्सर पीडित महिलेला मरण्यासाठी सोडून दिलं असतं का? हा एक मानवी संवेदनेचा प्रश्न होता... हा काही ललित मोदीला मदत करण्याचा मुद्दा नव्हता... हे दुर्भाग्यपूर्ण आहे की आज माझे जवळचे विरोधक मित्रच आज माझ्यावर आरोप करत आहेत. सध्या माझे ग्रह चांगले नाहीत... पण, मला विश्वास आहे की ग्रहांची दिशा लवकरच बदलेल, असंही स्वराज यांनी म्हटलं.
 
सुषमा स्वराज यांच्या या निवेदनानंतर 'मानवतेचीही सीमा असते' असं म्हणत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.