www.24taas.com, नवी दिल्ली
कोणतीही हिंदू संघटना दहशतवादी नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शिंदे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात वातावरण ढवळून निघालं होतं. हा मुद्दा राज्यसभेत चर्चेला आता तेव्हा खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना, केंद्र सरकारने ३६ दहशतवादी संघटना आणि ९ बेकायदेशीर संघटनांवर बंदी असल्याचं सांगितलं.
यात सिमी, लिट्टे आणि पीपल्स लिबरेशन आर्मीसह काही संघटनांचा समावेश आहे. मात्र काही दिवसापूर्वीच सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदुत्ववादी संघटनांवर तोफ डागली होती.