कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घालणारा अटकेत

प्रजासत्ताक दिनी आपल्या पाळीव कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घातल्याप्रकरणी सूरतमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

Bollywood Life | Updated: Feb 9, 2016, 09:51 PM IST
कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घालणारा अटकेत  title=

सुरत : प्रजासत्ताक दिनी आपल्या पाळीव कुत्र्याला तिरंग्याचा ड्रेस घातल्याप्रकरणी सूरतमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या गुन्ह्याखाली सोमवारी संध्याकाळी स्थानिक पोलिसांनी या कुत्र्याच्या मालकाला अटक केली.

सूरतमध्ये राहणाऱ्या भरत गोहील यांनी प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या पेट शोमध्ये आपल्या लॅब्राडोर कुत्र्याला तिरंग्यातच लपेटलं होतं. ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

हा प्रकार पाहून खवळलेल्या अझीज सायकलवाला यांनी रविवारी गोहील यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. तिरंग्यातील कुत्र्याचा फोटो त्यांनी पुराव्यासाठी दिला होता. त्या आधारे, पोलिसांनी आवश्यक चौकशी करून भरत गोहील यांना ताब्यात घेतलं.

येत्या १३ फ्रेब्रुवारीला सूरतमधील प्राणी प्रेमी क्लबने पेट मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे. त्यावेळी पुन्हा असा विचित्र प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेणार आहेत.