सुनंदा पुष्कर मृत्यू : अमरसिंह यांची एसआयटीकडून चौकशी

सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू प्रकरणी माजी खासदार अमरसिंह यांची आज एसआयटीने तब्बल दोन तास चौकशी केली. 

Updated: Jan 28, 2015, 11:00 PM IST
सुनंदा पुष्कर मृत्यू : अमरसिंह यांची एसआयटीकडून चौकशी title=

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू प्रकरणी माजी खासदार अमरसिंह यांची आज एसआयटीने तब्बल दोन तास चौकशी केली. 

आयपीएल प्रकरणाबाबत पुष्कर आपल्याशी बोलल्या होत्या, असा दावा अमरसिंह यांनी केला होता.  आयपीएल प्रकरणात शशी थरूर यांच्यावर येऊ घातलेला आळ स्वतःवर घेण्याचा सुनंदा यांनी प्रयत्न केल्याचा दावा अमरसिंह यांनी केला होता. 

शशी थरूर आणि मेहर तरार यांच्यातल्या कथित संबंधांबाबतही अमरसिंह यांना एसआयटीने प्रश्न विचारल्याची माहिती मिळतेय. 

सत्य लपवून ठेवण्यात काहीही अर्थ नाही त्यामुळे आपण एसआयटीला सगळी माहिती दिल्याचं अमरसिंह यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.