आत्महत्या : महिलांपेक्षा विवाहित पुरूषांची संख्या दुप्पट

देशात गेल्या काही दिवसात आत्महत्येचे प्रमाणात वाढत चालले आहे. 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो' (एनसीआरबी) ने जाहीर केलेल्या आत्महत्येसंदर्भातील आकडा चकित करणारा आहे.

Updated: Jul 26, 2015, 01:39 PM IST
आत्महत्या : महिलांपेक्षा विवाहित पुरूषांची संख्या दुप्पट  title=

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसात आत्महत्येचे प्रमाणात वाढत चालले आहे. 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो' (एनसीआरबी) ने जाहीर केलेल्या आत्महत्येसंदर्भातील आकडा चकित करणारा आहे.

आत्महत्या करण्यात महिलांपेक्षा पुरूषांची संख्या अधिक आहे आणि एवढेचं नाही तर विवाहित महिलांपेक्षा विवाहित पुरूषांचीचं संख्या दुप्पट असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. 

2014 या वर्षात सुमारे 60 हजार पुरुषांनी आत्महत्या केली तर याउलट 27 हजार महिलांनी आपले जीवन आत्महत्या करून संपवले असे चकित करणारे आकडे एनसीआरबीच्या अहवालातून समोर आले आहे. 

या व्यतिरिक्त 1400 विधूरांनी तर 1300 विधवांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच 550 घटस्फोटीत पुरूष तर 410 घटस्फोटीत महिलांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. अशी माहिती एनसीआरबीने दिली आहे. 

न्युरो सायकॅट्रिक्सनुसार पुरूषांमध्ये आत्महत्या करण्याची भावना अधिक असते याउलट महिला बरेच वेळा आत्महत्या करण्याचा विचार करतात पण काही कारणांमुळे त्या आत्महत्या करत नाही.

डिप्रेशन हे आत्महत्येचे मुळ कारण बनले आहे, असे न्युरो सायकॅट्रिक्स यांच्या सर्वेक्षणातून दिसले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.