मोदींचे दैवतीकरण नको, संघाची भाजपला तंबी

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षातील काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'देवाची देणगी' म्हणत असल्याने नाराजी वर्तवली आहे.

Updated: Mar 23, 2016, 12:48 PM IST
मोदींचे दैवतीकरण नको, संघाची भाजपला तंबी title=

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पक्षातील काही जण पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'देवाची देणगी' म्हणत असल्याने नाराजी वर्तवली आहे. मंगळवारी भाजपच्या काही नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत संघाने ही नाराजी व्यक्त केली. 

मंगळवारी भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजप अध्यक्ष अमित शाह यांना 'राष्ट्रवादा'च्या मुद्द्यावर पुढे जाण्यास अनुमती दिली आहे. त्याचसोबत विकासाचा मुद्दाही पुढे नेण्याची सूचना केली आहे.

पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघाने काही भाजप नेते मोदींना देवाची देणगी म्हटल्याबाबत नाराजी वर्तवली आहे. 'भाजपने कोणाचीही व्यक्तीपूजा न करता एक संघटना म्हणून काम करावे' असा संघाचा आग्रह आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडूंनी 'नरेंद्र मोदी म्हणजे भारताला लाभलेली दैवी देणगी आहे' असे विधान केले होते.