केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर दगडफेक

आसनसोलमध्ये केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासमोर दोरदार वाद-विवाद झाला. तेथे जमलेल्या जमावाने त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक देखील झाली यामध्ये ते जखमी झाल्याचं देखील म्हटलं जातंय.

Updated: Oct 19, 2016, 08:12 PM IST
केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्यावर दगडफेक title=

कोलकाता : आसनसोलमध्ये केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासमोर दोरदार वाद-विवाद झाला. तेथे जमलेल्या जमावाने त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक देखील झाली यामध्ये ते जखमी झाल्याचं देखील म्हटलं जातंय.

बाबुल सुप्रियो हा भाजप कार्यकर्त्यांसोबत निघाले होते. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी घेरली. दोन्ही बाजूकडून घोषणाबाजू सुरु होती. वाद इतका वाढला की, हाणामारी पर्यंत पोहोचला. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बाबुल सुप्रियो यांच्या गाडीवर दगडफेक सुरु केली. दोन्ही पक्षाच्या या वादात अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. तृणमूल हे गुंडगिरी करत असल्याचं बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे.