स्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी

भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.

Updated: Nov 2, 2016, 11:48 AM IST
स्टेट बँकेने होमलोनचे व्याजदर केले कमी title=

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होम लोन रेट कमी केला आहे. होम लोन रेट ६ वर्षांसाठी आता सर्वात खालच्या थराला पोहोचला आहे. एसबीआयने होम लोन आता ९.१ टक्के केला आहे. ही स्कीम सणांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे. या स्कीमनंतर उपभोक्त्याला कर्जाच्या रुपात दिलेली रक्कमवर कमी ईएमआय भरावा लागेल.

या फेस्टिव स्कीमनुसार महिलांसाठी होमलोन ९.१ टक्क्यांनी तर इतरांसाठी होम लोन ९.१५ टक्के व्याजदरावर मिळेल. याआधी होम लोनवर व्याजदर ९.२५ टक्के होतं. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार होम लोनमध्ये ५० लाखांच्या लोनवर प्रत्येक महिन्याला ५४२ रुपयांपेक्षा कमी ईएमआय द्यावा लागेल. मार्चपासून आतापर्यंत ईएमआयमध्ये जवळपास १५०० रुपयांची घट करण्यात आली आहे.