वन रँक, वन पेन्शन : निवृत्त सैनिकाची आत्महत्या

 वन रँक, वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Updated: Nov 2, 2016, 11:38 AM IST
वन रँक, वन पेन्शन : निवृत्त सैनिकाची आत्महत्या  title=

चंदीगढ : निवृत्त सैनिकांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर वन रँक वन पेन्शन मिळावी म्हणून आंदोलन केले होते. त्यावेळी निवृत्त सैनिकांना आश्वासन दिले होते. मात्र, दुर्लक्ष केल्याने वन रँक, वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

सुबेदार राम किशन गरेवाल असे आत्महत्या केलेल्या निवृत्त सैनिकाचे नाव आहे. ते भिवानी जिल्ह्यातील बुमला गावचे रहिवासी आहेत. आपल्या राहत्या घरी विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्या केली आहे. 
 
सुबेदार राम किशन गरेवाल यांना वन रँक वन पेन्शनसंबंधी तक्रार करायची होती. यासाठी त्यांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घ्यायची होती. मात्र त्यांची भेट घेण्यास नकार देण्यात आल्याने सुबेदार राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झालेय.