नवी दिल्ली : ‘वेश्यावृत्ती वैध करायला हवी’ असं म्हणत कर्नाटकच्या लिंगायत सुमदायाच्या धर्मगुरु माथे महादेवी यांनी एक नव्या वादाला तोंड फोडलंय.
देशात होणाऱ्या बलात्कारांसाठी मुलींचे भडकाऊ कपडे कारणीभूत असल्याचंही महादेवी यांनी म्हटलंय... वेश्यावृत्तीला परवानगी दिली गेली तर देशातील बलात्काराचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, माते महादेवी या कर्नाटकातील कुडला इथल्या बासावा धर्मपीठाच्या अध्यक्षस्थानी आहेत. कर्नाटकाती लिंगायत समूहाचं हे सर्वात पवित्र धर्मस्थळ मानलं जातं.
महिला धर्मगुरुंनी केलेल्या या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला जन्माला घातलंय. महादेवी यांच्या या वक्तव्याचा निषेध करत कर्नाटकातली अनेक ‘एनजीओ’ समोर आल्यात.
‘मुली जेवढे भडकाऊ कपडे वापरतील तेवढेच बलात्कार वाढतील. मुलींनी पाश्चिमात्य कपड्यांचा त्याग करायला हवा आणि असे कपडे वापरावेत ज्यांतून त्यांच्या संस्कृतीचं दर्शन हील. मुलींचे तंग कपडे गुन्हेगारांना बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहीत करतात’ असं महादेवी यांनी धारवाडमध्ये म्हटलंय.
‘वेश्यावृत्तीला कायदेशीर परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी मी पहिलीच व्यक्ती नाही. हीच मागणी समाजातल्या अनेक वर्गांनी याअगोदरही केलीय. वेश्यावृत्तीला परवानगी दिली गेली नाही तर महिलांसोबत बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना कमी होणार नाहीत’ असंही त्यांनी म्हटलंय.
इतकंच नाही, तर काही महिला आपल्या सुरक्षेसाठी बनविण्यात आलेल्या कायद्यांचा चुकीचा वापर करत असल्याचंदेखील त्यांनी यावेळी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.