हैदराबाद : सादिक दहा वर्षाचा असला, तरी तो एका दिवसासाठी हैदराबादचा पोलिस आयुक्त झाला आहे. दहा वर्षांच्या सादिकची एके दिवशी पोलिस आयुक्त व्हायची इच्छा होती.
असाध्य रोगाने ग्रस्त असलेल्या सादिकची इच्छा हैदराबाद पोलिसांनी बुधवारी पूर्ण केली. सादिकला एक दिवसासाठी शहर पोलिस आयुक्तांच्या खुर्चीवर बसवून त्याचे स्वप्न पूर्ण केले
तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यात राहणारा सादिक असाध्य रोगाने त्रस्त आहे. एका पोलिस नातेवाइकाला पाहून एके दिवशी आपण पोलिस प्रमुख होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते.
असाध्य रोग जडलेल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करणारी संस्था 'मेक अ विश फाउंडेशन'ने सादिकची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला हैदराबादचे आयुक्त रेड्डी यांनी साथ दिली.
पोलिस आणि 'मेक अ विश फाउंडेशन'च्या प्रयत्नांनंतर खाकी वर्दी आणि टोपी घातलेला सादिक पोलिस आयुक्तांच्या खुर्चीवर बसला.
'पोलिस आयुक्त झाल्यानंतर काय करशील,' या प्रश्नावर 'गुंडांना पकडेन,' असे उत्तर सादिकने दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.