उत्तर प्रदेशात पुन्हा 'यादवी', मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं बंड

उत्तर प्रदेशातला सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. 

Updated: Dec 29, 2016, 09:59 PM IST
उत्तर प्रदेशात पुन्हा 'यादवी', मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं बंड title=

लखनऊ : उत्तर प्रदेशातला सत्ताधारी समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. बुधवारी मुलायम सिंग यादवांनी जाहीर केलेल्या यादीमुळे नाराज झालेले मुख्यमंत्री अखिलेश यादव आपली वेगळी समांतर उमेदवारी यादी जाहीर केल्याची बातमी एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे आत्ताचे 171 आमदार तर 64 नवे चेहेरे आहेत.

बुधवारी मुलायमसिंगांनी अखिलेश यांच्या अनुपस्थितीत 325 जणांची यादी जाहीर केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या पक्षांतर्गत राजकारणाला वेग आलाय. अखिलेश, मुलायम आणि प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांच्या निवासस्थानांवर समर्थकांची गर्दी झाली.

अखिलेश समर्थक असलेल्या अनेक विद्यमान आमदारांना पहिल्या यादीतून वगळण्यात आलंय. या आमदारांशी चर्चा केल्यानंतर अखिलेश यांनी मुलायम सिंगांशी चर्चाही केली. मात्र यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही. त्यामुळे अखिलेश यादव यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.