कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना रोखण्यासाठी भाजप दादाचा सहारा घेणार असल्याचं दिसतंय.
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सौरव गांगुली लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. क्रिकेट विश्वात 'दादा' म्हणून ओखळ असलेला सौरव गांगुली भाजपचा पश्चिम बंगामधील चेहरा असू शकतो.
'आप'वर झाडू फिरवण्यासाठी दिल्लीत किरण बेदींच्या रुपाने भाजपनं मास्टर स्ट्रोक लगावला. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना शह देण्यासाठी भाजप सौरव गांगुलीला पक्षात घेऊन 'बाऊन्सर' टाकण्याच्या तयारीत आहे.
सौरवच्या लोकप्रियतेचा बंगालमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो असा कयास बांधला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.