www.24taas.com,अलाहाबाद
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं आणि भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुंभमेळा दौरा रद्द करण्यात आलाय.
उत्तर प्रदेश सरकारने सोनिया गांधींच्या महाकुभमेळा भेटीसाठी आवश्यक सुरक्षा पुरविण्यास असमर्थता दाखवल्याने हा दौरा रद्द करण्यात आला. मात्र या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने जाणुनबुजून असहकार्य केल्याचे उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे आहे.
सुरक्षेच्या कारणांमुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा महाकुभ दौरा रद्द करण्यात आलाय. १२ फेब्रुवारीला मोदी महाकुभ मेळ्याला भेट देणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांनी हा दौरा रद्द केलाय.
दरम्यान, कुंभमेळाव्याला आलेल्या भाविकांवर दुखाचा डोंगर कोसळला. अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर झालेली गर्दी आणि फलाटाचा कठडा कोसळून झालेल्या अपघातात ३२ जण ठार तर १० जण जखमी झालेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अलाहाबादमध्ये कुंभमेळा भरलेला असून रविवारी शाही स्नान असल्यानं कोट्यवधी भाविक गंगेत डुबकी मारण्यासाठी अलाहाबादेत जमले होते. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. प्लॅटफॉर्म नंबर सहावरचा फूटओव्हर ब्रीजचा कठडा तुटल्यानं ही दुर्घटना घडलीय.