लष्कर प्रमुखांकडे जवानांना थेट तक्रार करता येणार!

एका भारतीय जवानाने लष्कराला कशा प्रकारचा आहार दिला जातो, याविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, हा व्हिडीओ व्हायरल झाला. भारतीय जवानांना आपली तक्रार मांडण्यासाठी योग्य ती जागा नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला हे दिसून आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 28, 2017, 01:51 PM IST
लष्कर प्रमुखांकडे जवानांना थेट तक्रार करता येणार! title=

नवी दिल्ली : एका भारतीय जवानाने लष्कराला कशा प्रकारचा आहार दिला जातो, याविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, हा व्हिडीओ व्हायरल झाला. भारतीय जवानांना आपली तक्रार मांडण्यासाठी योग्य ती जागा नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला हे दिसून आलं.

भारतीय लष्कराने आता जवानांची तक्रार थेट लष्करप्रमुखांकडे व्हावी, यासाठी एक व्हॉटस अॅप नंबर जारी केला आहे. यामुळे लष्कर प्रमुखांना या अडचणी समजून घेता येतील आणि सोशल मीडियावर गैरसोयी अडचणींचे वाभाडे निघण्यापेक्षा, थेट समस्या सुटतील.

भारतीय जवानांना  0 9643 300 008 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपल्या तक्रारी व्हिडीओ, फोटो, लेखी तक्रारीने पाठवता येणार आहेत, मेसेज करूनही जवानांना आपल्या तक्रारी देता येतील. भारतीय लष्कराने अंतर्गत वाद सोडवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.