नवी दिल्ली: बिहारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियाद्वारे अशी अफवा पसरवली जात आहे की, चंद्र उलटा आणि विचित्र दिसतोय. या अफवेमुळे बिहारमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वांना सांगण्यात येत आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
अमेरिकेच्या नासा स्पेस सेंटरकडून असे मेसेज पाठवले जात असल्याची माहिती आहे. मात्र, नासा इस्रोकडे अशी कोणतीही यंत्रणा नाही की ज्याद्वारे भूकंप किंवा कोणत्या नैसर्गिक आपत्तीची वेळ मिळू शकेल.
केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं की, 'अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत.'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.