आवाज करणारा साप बनला चर्चेचा विषय

गणेशपूर येथील झाडा-झुडपांजवळ पकडला गेलेला साप सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य की असा साप पहिल्यांदाच पाहिला.

Updated: Jun 30, 2016, 05:05 PM IST
आवाज करणारा साप बनला चर्चेचा विषय  title=

उत्तरप्रदेश : गणेशपूर येथील झाडा-झुडपांजवळ पकडला गेलेला साप सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य की असा साप पहिल्यांदाच पाहिला.

हा साप कोणत्या जातीचा आहे याची ओळख पटलेली नाही. काही वेळानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आणि सापाला त्यांच्याकडे सोपावण्यात आलं.

रात्री गावातील काही लोकांना एक विचित्र आवाज ऐकला. झाडांच्यामधून हा आवाज येत होता. त्यानंतर टॉर्च लावून पाहण्यात आलं तर तिथे एक साप दिसल्या आणि त्याच्या तोंडातून एक विचित्र आवाज येत होता. त्यानंतर दोन जणांनी हिम्मत करुन त्या सापाला पकडलं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही या सापाची ओळख पटवता आली नाही. यानंतर एका सर्प तज्ज्ञाला या सापाची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं आहे.