कानपूर: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडलीय. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली कारण शाळेत शिक्षकानं तिचे कपडे काढून शोध घेतला. विद्यार्थिनीनं त्याची लाज वाटून आत्महत्या केली.
शहरातल्या एका प्रायव्हेट शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या आईनं आरोप लावलाय की, तिच्याजवळ मोबाईल फोन होता. त्याचा शोध घेण्यासाठी शिक्षकानं तिची तपासणी केली. तिचे कपडे उतरवले. त्यामुळं विद्यार्थिनी शर्मेनं अर्धमेली झाली आणि तिनं शुक्रवारी रात्री आत्महत्या केली.
पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.