सिद्धू १५ ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश

नवज्योत सिंग सिद्धू १५ ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सिद्ध यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. 

Updated: Jul 28, 2016, 11:15 PM IST
सिद्धू १५ ऑगस्टला 'आप'मध्ये करणार प्रवेश title=

नवी दिल्ली : नवज्योत सिंग सिद्धू १५ ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सिद्ध यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. 

माजी  क्रिकेटपटू आणि राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी खासदारकीचा राजीनामा यापूर्वीच दिला आहे. सिद्धूने भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धूचा राजीनामा आणि आप पक्षातील प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. आम आदमी पार्टीला यांचा पंजाबमध्ये मोठा फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

मात्र सिद्धू हे आम आदमी पार्टीकडून पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार  नसतील असं देखील दुसरीकडे सांगितलं जात आहे.

 पक्षाला मला पंजाब निवडणुकीपासून दूर ठेवायचं असल्यानं मी राजीनामा दिल्याचं यावेळी नवज्योत सिंग सिद्धूनं सांगितलं.   दरम्यान यापूर्वी सिद्धू भाजप पक्षावरील नाराजी व्यक्त केली होती. 

पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून देशातील तरुणांची सेवा करण्याची संधी पक्षनेतृत्वाने दिली नसल्याची भावना नवज्योत सिद्धूनं व्यक्त केली होती. भाजपला आणि देशाला द्यावे असे माझ्याकडे बरेच काही होते, असंही सिद्धूने म्हटलं होतं.