राहुल गांधींवर बूट हल्ला

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत.

Updated: Sep 26, 2016, 04:28 PM IST
राहुल गांधींवर बूट हल्ला title=

सीतापूर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहेत. या किसान यात्रेवेळी सीतापूरमध्ये रोड शो दरम्यान राहुल गांधींवर बुटानं हल्ला करण्यात आला आहे.

पोलिसांनी बूट फेकणाऱ्याला अटक करण्यात आलीय.  पण बूट नेमका का फेकून मारला याबद्दल काहीह माहिती मिळू शकलेली नाही. राहुल गांधी यांनी मात्र याप्रकरणावरून भाजप आणि आरएसएसवर टीका केली आहे. आरएसएस आणि भाजपवाल्यांनी माझ्यावर कितीही बूट फेकले तरी मी घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

राहुल गांधींवर बूट हल्ला, पाहा व्हिडिओ

बूट हल्ल्यानंतर राहुल गांधींची टीका