'नवाजुद्दीनला केलेल्या 'रामलीला'विरोधाचं समर्थन नाही'

 नवाजुद्दीन सिद्दीकी यांना रामलीलेतील भूमिका करण्यास जो विरोध आहे त्याचं शिवसेना समर्थन नाही करत असं ट्विट शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

Updated: Oct 10, 2016, 11:41 PM IST
'नवाजुद्दीनला केलेल्या 'रामलीला'विरोधाचं समर्थन नाही' title=

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी यांना रामलीलेतील भूमिका करण्यास जो विरोध आहे त्याचं शिवसेना समर्थन नाही करत असं ट्विट शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे की कोणी नवाजुद्दीन यांना रामलीलाचं आयोजन करण्यापासून रोखलं. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेच्या वाढत्या प्रभावामुशे इतर पक्ष चिंतेत असल्याचं शिवसेनेच्या सूत्रांनी म्हटलंय. अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. तो चिंतेत असणारा पक्ष भाजप आहे का असं प्रश्न विचारला असता तो पक्ष कोणताही असू शकतो. सपा, बसपा, काँग्रेस, बीजेपी असं त्यांनी म्हटलं आहे पण शिवसेना याप्रकरणाची त्यांच्या स्तरावर चौकशी करेल असं देखील त्यांनी म्हटलंय.