सर्वपक्षीय बैठकीतील भूमिका का बदलली?, पवारांचा सवाल

दोषी खासदारांबाबतच्या अध्यादेशावर काँग्रेसच्या घुमजावाच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 2, 2013, 03:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दोषी खासदारांबाबतच्या अध्यादेशावर काँग्रेसच्या घुमजावाच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलीय.
सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस आणि भाजपनं वटहुकुमाचं समर्थन केलं होतं. मात्र, वटहुकुमानंतर दोन्ही पक्षांनी भूमिका बदलत विरोध केला, असं सांगत पवारांनी काँग्रेस आणि भाजपला लक्ष्य केलंय. सर्वपक्षीय बैठकीत विचारपूर्वक मते मांडली नव्हती का? असा सवालही त्यांनी केलाय. राहुल गांधी यांच्या आक्षेपावरही पवारांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. वटहुकुम काढण्याचा निर्णय कॅबिनेटचा होता, त्यावर बाहेर चर्चा करणं अयोग्य असल्याचं मतही पवारांनी व्यक्त केलंय.
राहुल गांधी यांचा आक्षेप, त्यानंतर सुरु झालेला वाद, याबाबत शरद पवारांनी पहिल्यांदाच झी मीडियाकडे प्रतिक्रिया नोंदवली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.