भल्याभल्यांना पाणी पाजणाऱ्या शरद पवारांनाही भेटले 'महाठग'!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांच्या नावाचा गैरवापर करून लोकाना फसवण्यात येत असल्याची तक्रार दाखल केलीय. 

Updated: Nov 19, 2015, 06:51 PM IST
भल्याभल्यांना पाणी पाजणाऱ्या शरद पवारांनाही भेटले 'महाठग'! title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांच्या नावाचा गैरवापर करून लोकाना फसवण्यात येत असल्याची तक्रार दाखल केलीय. 

ब्रिटनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या एका घोटाळेबाज कंपनीत पवारांचं नाव संचालक म्हणून वापरण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय. या संदर्भातलं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या तक्रारीत सर्वेश भारदे आणि शहनाझ भारदे अशा दोघांचा उल्लेख केलाय. विशेष म्हणजे, सर्वेश भारदे आणि शहनाझ भारदे या दोन व्यक्तींना आपण ओळखत नसल्याचा पवारांचा दावा आहे. 

या दोघांनी ब्रिटनमध्ये एक कंपनी स्थापन केली. त्यावेळी शरद पवार यांचं नाव, पत्ता आणि जन्मतारीख याच्या आधारे त्यांना संचालक बनवण्यात आलं. सुरुवातीला दोन वर्ष कंपनीच्या संचालक पदावर काम करणाऱ्या पवारांनी २०११ मध्ये संचालक पदाचा राजीनामा दिला. पण हा सगळा प्रकार पवारांना न सांगता करण्यात आला, असं पवारांनी तक्रारीत म्हटलंय.

सध्या अशाच एका प्रकरणात राहुल गांधींचं नाव आलंय. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी याप्रकरणात राहुल गांधींच नागरिकत्वच रद्द करण्याची मागणी केलीय. पवारांनी बहुदा याच प्रकरणाचा धसका घेऊन तब्बल चार वर्ष जुन्या प्रकरणात आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.