आसाराम बापू जेलमध्येच की बाहेर पडणार, आज फैसला

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आसाराम बापूंना जेलमध्येच रहावं लागतंय की बेल मिळते याकडे लक्ष लागले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 3, 2013, 09:59 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना आज त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आसाराम बापूंना जेलमध्येच रहावं लागतंय की बेल मिळते याकडे लक्ष लागले आहे.

एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आलाय. त्यानंतर शनिवारी रात्री अटक झाली होती. एक दिवसाची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्यांना सोमवारी पुन्हा जोधपूरमध्ये न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांची कोठडी न मागिल्यामुळे आसाराम बापूंना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आले आहे.
आसाराम बापू यांना राजस्थान पोलिसांनी ३० ऑगस्ट पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स धाडले होते. मात्र बापूंनी वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ केली. अखेर पोलिसांनी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री बापूंना इंदूर येथे अटक केली. त्यानंतर त्यांना रविवारी सकाळी जोधपूर येथे नेण्यात आले. रविवारी संध्याकाळी बापूंना कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे बापूंना एक रात्र पोलीस कोठडीत काढावी लागली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.