www.24Taas. झी मीडिया, गांधीनगर
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाजपला अडचणीत आणले आहे. भाजपन लोकसभा निवडणूक प्रचार समितीचे प्रमुखपद बहाल केले. तर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींना प्रमोट केले. मात्र, शिक्षक दिनाच्या कार्य़क्रमात मोदींनी मला गुजरातची २०१७पर्यंत सेवा करायची आहे. मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलेले नाही, असे विधान केले आहे.
मला गुजरातमधील जनतेने निवडून दिले आहे. मला या राज्याची सेवा करायची आहे. मी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिले नाही आणि पाहणारही नाही. मला गुजरातचा विकास करायचा आहे. जनतेने मला २०१७ पर्यंत सेवा करण्याचा जनादेश दिला आहे. पंतप्रधानपदाचे स्वप्न जो पाहतो तो बरबाद होतो. ते स्वप्न मी पाहत नाही आणि मला ते पाहायचेसुद्धा नाही, असे मोदींनी सांगितले.
शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना मोदी यांनी एका विद्यार्थिनीने पंतप्रधान बनण्याबाबत सवाल केला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. पंतप्रधान पदासाठी आपण प्रयत्न जरूर करत आहोत हे त्यांनी मान्य केले, पण त्या पदाचे स्वप्न रंगवण्यात आपण गढून गेलेलो नाही, असे मोदी म्हणाले.
भाजपकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित कण्यास वेळ होत असल्याने मोदींच्या या वक्तव्यावरून त्यांची नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.