रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर

रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर झाले आहे. बॅंकेने सीआरआरमध्ये २५ टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 18, 2012, 07:13 AM IST

www.24taas.com,मुंबई
रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर झाले आहे. बॅंकेने सीआरआरमध्ये २५ टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या सततच्या कडक पतधोरणामुळे औद्योगिक विकास खुंटला आहे. केंद्र सरकारने धाडसी आर्थिक निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर आरबीआय पतधोरणात व्याजदरात कपात करील, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही झालेले नाही. त्यामुळे कर्जदारांची निराशा झाली आहे.
कारण आज जाहीर केलेल्या धोरणामुळं कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. सीआरआर मध्ये पाव टक्क्यानी कपात केल्यामुळे बँका बाजारात अधिक १७ हजार कोटी रुपयांची उलाढाल करू शकणार आहेत. महागाईच्या वाढत्या आलेखाला चाप लावण्यासाठी आम्हाला हे धोरण स्विकारावं लागल्याचं गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सांगितले.
सीआरआरमध्ये २५ टक्क्यांनी कपात केली. रेपोदरात काहीही बदल करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर सीआरआर ४.५ टक्के झाला आहे. ही कपात २२ सप्टेंबरपासून लागू होईल. तर सीआरआरच्या कपातीमुळे सरकारी तिजोरीत १७,००० कोटी रुपये अधिक जमा होतील.
डिझेलची दरवाढ आणि तीन वेळा व्याजदरात कपात यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेला चलनवाढीचा सामना करणे कठीण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. डिझेल दरवाढ आणि अनुदानित सिलिंडरची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय याचा येत्या काळात चलनवाढीवरील दबाव वाढणार आहे. याचा चलनवाढीवर ०.६० टक्के परिणाम होऊ शकतो, असे क्रिसिलने म्हटले आहे.
आरबीआयने १३ वेळा प्रमुख व्याजदारात वाढ केल्याने वित्तपुरवठा महागला आहे. याचा औद्योगिक क्षेत्रावर परिणाम होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने आता चलनवाढीच्या दराला महत्त्व देणे थांबवावे. या धोरणामुळे औद्योगिक विकास घटत असल्याची टीका ‘असोचेम’चे अध्यक्ष राजकुमार धूत यांनी केली आहे.