धावत्या ट्रेनसमोर सेल्फी काढणाऱ्या तिघांचा मृत्यू

रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह मथुरा इथल्या तिघा तरुणांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळावर उभे राहून फोटो काढताना मागून येणाऱ्या एक्सप्रेसखाली सापडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात एक तरुण बचावला आहे.

Updated: Jan 27, 2015, 03:19 PM IST
धावत्या ट्रेनसमोर सेल्फी काढणाऱ्या तिघांचा मृत्यू title=

मथुरा: रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह मथुरा इथल्या तिघा तरुणांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळावर उभे राहून फोटो काढताना मागून येणाऱ्या एक्सप्रेसखाली सापडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात एक तरुण बचावला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनिमित्त दिल्लीत राहणारा अफजल त्याचे मित्र याकूब, इक्बाल आणि अनीश यांच्यासोबत एका गाडीतून आग्रा इथल्या ताजमहालला निघाला होता. आग्रा इथं जात असताना राष्ट्रीय महामार्गावर नवीपूर इथं त्यांना रेल्वे मार्ग लागला. या रेल्वे मार्गावर फोटो काढून ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकायचे असा बेत त्यांनी आखला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून ते चौघंही रेल्वे मार्गावर गेले. 

अफजल, इक्बाल आणि याकूब हे तिघंही सेल्फी काढण्यात रमले असताना मागून भरधाव वेगात एक ट्रेन आली आणि ते तिघंही ट्रेनखाली सापडले. या तिघांचं छायाचित्र काढणारा अनिश हादेखील या अपघातात जखमी झाला असून अपघातानंतर तो बेशुद्ध झाला आहे. अनिशच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पोलीस त्याची चौकशी करणार असून यानंतरच नेमकं काय घडलं हे समजू शकेल, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.