ओबामांना भारतात बाईकने फिरायचं होतं, पण...

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, 'मला मोटरसायकलचा प्रवास खूप आवडतो, पण सीक्रेट सर्व्हिसेसने मला मोटरसायकल चालवण्याची परवानगी दिली नाही'.

Updated: Jan 27, 2015, 02:30 PM IST
ओबामांना भारतात बाईकने फिरायचं होतं, पण... title=

नवी दिल्ली :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले, 'मला मोटरसायकलचा प्रवास खूप आवडतो, पण सीक्रेट सर्व्हिसेसने मला मोटरसायकल चालवण्याची परवानगी दिली नाही'.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं दिल्लीतील सिटी फोर्ट सभागृहात २ हजार विद्यार्थ्यांसमोर भाषण झालं.

भाषणाची सुरूवात बराक ओबामा यांनी 'नमस्ते'ने केली आणि सांगितलं की, भारताच्या युवकांमध्ये मला एक आशेचा किरण दिसतोय.

प्रजासत्ताकदिनाला विशेष अतिथी म्हणून आपल्याला आमंत्रण दिलं म्हणून भारताचे धन्यवाद मानले, आणि बराक ओबामा म्हणाले 'बहुत धन्यवाद'

बराक ओबामा जेव्हा मंचावर भाषण करायला आले, तेव्हा लोकांना ओबामांचं ओबामा..ओबामा..ओबामा म्हणून स्वागत केलं आणि आपल्या स्मार्ट फोनमध्ये फोटोही टिपले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.