नवी दिल्ली : सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेला एवढं महत्व दिलं जात नाही, तुलनेनं काही विशेष व्यक्तींच्या सुरक्षेला खूप मोठ्या प्रमाणात महत्व दिलं जातं, तर मग सामान्याच्या सुरक्षेवरही एवढी भर का दिली जात नाही, असा सवाल हायकोर्टानं सरकारला केला आहे.
कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यासाठी दिल्लीत एका आठवड्यात तब्बल १५ हजार सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र सरकारच्या या तत्परतेला हायकोर्टानं चांगलेच ताशेरे ओढले आहेत.देशाच्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत एवढी संवेदनशीलता का दाखवली जात नाही?, असा खडा सवाल हायकोर्टानं केलाय.
ओबामांच्या भेटीनंतर दिल्लीत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढू नयेत, यासाठी याचिका करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने सरकारला फटकारलंय, तसंच ओबामा यांच्या दौऱ्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात येणार आहेत का? अशी नोटीस हायकोर्टाने केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांना बजावलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.