www.24taas.com,झी मीडिया, राजस्थान
राजस्थान सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी नवी योजना सुरू केली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत ५०% गूण मिळवल्यास त्यांना सरकारतर्फे स्कूटी देण्यात येईल.
या प्रस्तावाला राजस्थान सरकारने मंजुरी दिली आहे. यापूर्वी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी ६०% मिळवल्यास म्हणजेच प्रथम वर्ग मिळवल्यास त्यांना स्कूटी देण्याची योजना होती. आता अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी ५०% मिळवले तरीही त्यांना स्कूटी मिळणार आहे. पदवी परीक्षेत ५५% मिळवणाऱ्या विद्यार्थिनींना १० हजार रुपये तसंच पदव्युत्तर परीक्षेत परीक्षेत ५५% मिळवणाऱ्यांना २० हजार रुपये सरकारतर्फे मिळणार आहेत. मात्र यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचं वारषिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवं, ही अट आहे.
स्कूटी वितरणाचं लक्ष्य नजरेसमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी स्कूटी वितरणाची संख्या ५०० होती. ती आता १००० करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा अभ्यासातील दर्जा वाढावा, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.