www.24taas.com, नवी दिल्ली
किश्तवाड हिंसाचार प्रकरणी आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांना दिलेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलली याची विचारणा कोर्टानं केलीये. जे ऍण्ड के पॅन्थर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंग यांनी केलेल्या याचिकेवर कोर्टानं हे आदेश दिलेत.
संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. अन्न सुरक्षा विधेयकासह अन्य विधेयकावर सर्वसंमती मिळवण्याचा सरकारकडून प्रयत्न होणार आहे.. एकीकडे गेमचेंजर प्लान अर्थात अन्न सुरक्षा विधेयकावरील चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे किश्तवाड हिंसाचार आणि राबर्ट वडेरा जमीन प्रकरणावरुन विरोधक आक्रमक आहेत.
पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्ल्यानंतर जम्मूमध्ये असलेल्या तणावादरम्यान थांबवण्यात आलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यात आलीय. चार दिवसांच्या ब्रेकनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झालीय. आज सकाळपासून भाविकांना अमरनाथकडे रवाना करण्यात आलं. तीन दिवसांत आठव्यांदा पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जवानही त्यांच्यासोबत आहेत. जम्मूच्या आठ जिल्ह्यात अजूनही कर्फ्यू लागू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.