नवी दिल्ली : नो़टबंदीनंतर पहिल्यांदाच नव्या वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने त्यांच्या काही नियमांत बदल केले आहेत.
देशातील कॅश ट्रांझॅक्शन्सपेक्षा ऑनलाईन ट्रांझॅक्शन्स वाढवण्यासाठी बँकेने हे नियम बदलले आहेत. बदललेले हे नियम काहीसे असे आहेत.
• होम ब्रँचवर दर महिन्याला ३पेक्षा जास्त कँश ट्रांझँक्शन केल्या गेल्या तर त्या प्रत्येक वाढीव ट्रांझॅक्शनला ५० रुपये जास्त द्यावे लागतील.
• कॅश ट्रांझँक्शन लिमिट ३लाखावरून घटवून २ लाखांवर आणली आहे. २ लाखाहून जास्तीच्या ट्रांझँक्शनला अवैध मानलं जाईल. ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झालेल्या कॅश ट्रांझँक्शनला दंड लावला जाईल. म्हणजेच ५ लाखाच्या कॅश ट्रांझँक्शनवर वरच्या २ लाखांच्या ट्रांझँक्शनचा दंड लागेल.
• खात्यात काहीच बँलेस नसेल तर त्यावरही दंडवसुली होईल. मोठ्या शहरातल्या खात्यांत कमीत-कमी ५००० तर ग्रामीण भागातील खात्यांत कमीत कमी २००० रुपये असणं आवश्यक आहे.
हे आहेत बँकांचे बदललेले नियम. यापुढच्या प्रत्येक ट्रांझँक्शन करताना हे निय़म नक्की लक्षात ठेवा.