मुझफ्फरनगर : आसाराम बापू यांच्या प्रकरणातील साक्षीदारांच्या हत्येसाठी सारख्याचं शस्त्रांचा वापर झाल्याची बाब समोर आली आहे. पाठीच्या कण्यात जवळून झाडलेली गोळी, देशी बनावटीची ए.१२ बोर गन आणि मोटरसायकलवरून हल्ला या समान गोष्टी आहेत.
या धाग्यांवरून मुझफ्फरनगर आणि शहाजानपूर पोलिसांनी आसाराम प्रकरणातील दोन साक्षीदारांच्या हत्येचा एकत्रितरित्या तपास सुरू केला आहे. आसाराम यांच्याविरुद्धच्या बलात्काराच्या खटल्यातील साक्षीदार अखिल गुप्ता याची ११ जानेवारी रोजी मुझफ्फरनगर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
तर १० जुलैला कृपाळ सिंह या दुसऱया साक्षीदाराला शहाजानपूर येथे गोळ्या झाडून ठार करण्यात आले. दोघांच्या हत्येची पद्धत आणि वापरण्यात आलेली बंदुक एकाच प्रकारची असल्याचे समोर आल्याने दोन्ही प्रकरणांतील हल्लेखोर एकच असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.