रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस

 साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. 

Updated: Aug 18, 2016, 03:19 PM IST
रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकला हरियाणाकडून 2.5 कोटींचे बक्षिस title=

 रोहतक : रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिला हरियाणा सरकारकडून 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. तर रेल्वेने 50 लाख जाहीर करुन उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपीक असलेल्या साक्षीला पदोन्नती मिळणार आहे.

साक्षी मलिकने ५८ किलो वजनी गटात तिने किर्गीझस्तानच्या अईसुलू टिनीबेकोवाला ८-५ असे हरवून ब्राँझपदक जिंकले. साक्षीच्या या विजयानंतर देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. हरियाणा सरकारकडूनही तिच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. तिला सरकारी नोकरीची ऑफरही देऊ केली आहे.

हरियाणाच्या क्रीडामंत्र्यांनी साक्षीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन कौतुक करत तिचे अभिनंदन केलेय. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, जिमॅस्टिक दीपा कर्माकर आदींनी खास शुभेच्छा दिल्यात.