साक्षी महाराजांचं, 'रात गई, बात गई'

 दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना शिक्षा होण्याची गरज असल्याचं भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. यापूर्वी चार मुलांना जन्म देण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदार साक्षी महाराज यांनी यू टर्न घेतला आहे. 

Updated: Jan 8, 2015, 09:41 PM IST
साक्षी महाराजांचं, 'रात गई, बात गई' title=

नवी दिल्ली :  दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना शिक्षा होण्याची गरज असल्याचं भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. यापूर्वी चार मुलांना जन्म देण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदार साक्षी महाराज यांनी यू टर्न घेतला आहे. 

 
हिंदुंनी कमीत कमी चार मुलांना जन्म द्यायला हवा, साक्षी महाराजांच्या या विधानावरुन मोठा वाद झाला होता. पण आता त्यांनी या वक्तव्यावरुन यू टर्न घेतला आहे. 

महाराजांची मुक्ताफळे

हिंदू महिलांनी किमान चार मुलांना जन्म द्यायला हवा, असा आपला आग्रह असेल.

त्यातील एक मूल त्यांनी साधू-महात्म्यांना द्यावं.

सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन होत असल्यामुळे एक मूल सीमेवर पाठवावे.
 
यानंतर ''रात गई, बात गई. मी कोणत्याही राजकीय व्यासपीठावरुन विधान केलं नाही. तो एक धार्मिक कार्यक्रम होता. त्याबाबत खूप वाद झाला आहे, मला यावर फार बोलायचं नाही. मी जर काही चुकीचं केलं असेन तर फासावर चढायला तयार आहे, असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे.
 
तसंच मीडिया चांगल्या गोष्टी सोडून केवळ वाईट गोष्टींवरच प्रकाश टाकत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. इतकंच नाही तर देशातील प्रत्येक मुस्लिम हा देशभक्त असल्याचंही साक्षी महाराज यावेळी म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.