www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. गुंतवणुकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात हजर न राहिल्यानं त्यांना त्यांच्याविरुद्ध वॉरंट बजावलाय.
सुब्रतो रॉय यांना ४ मार्चपर्यंत हजर करण्याचे आदेश कोर्टानं पोलिसांना दिलेत. रॉय यांच्या दोन कंपन्यांनी गुंतवणुकदारांचे २० हजार कोटी रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आलेत. यासंबंधी सुनावणीला रॉय वारंवार गैरहजर राहिलेत. रॉय यांच्या ९५ वर्षांच्या आईची प्रकृती ठीक नसल्यानं ते हजर राहू शकत नाहीत, असं त्यांचे वकील राम जेठमलानी यांनी कोर्टाला सांगितलं.
यावर संतापलेल्या कोर्टानं `आमचे हात खूप लांब आहेत. कालच त्यांना गैरहजर राहण्याची परवानगी नाकारली असताना ते आले नाहीत, असं सांगत कोर्टानं रॉय यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.