सचिनने राज्यसभेत पहिल्यांदा विचारला प्रश्न

राज्यसभेत खासदार म्हणून निवड झालेल्या सचिन तेंडुलकरला 3 वर्ष झाली आहेत. पण खासदार म्हणून सचिनने 3 वर्षात पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे. 

Updated: Dec 6, 2015, 02:26 PM IST
सचिनने राज्यसभेत पहिल्यांदा विचारला प्रश्न title=

नवी दिल्ली : राज्यसभेत खासदार म्हणून निवड झालेल्या सचिन तेंडुलकरला 3 वर्ष झाली आहेत. पण खासदार म्हणून सचिनने 3 वर्षात पहिल्यांदाच प्रश्न विचारला आहे. 

शुक्रवारी सचिनने रेल्वे मंत्रालयाला रेल्वेशी संबधित प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी त्यांना लिखित स्वरुपात दिलं आहे. 

दुसरा प्रश्न सचिनने  परिवहन मंत्रालयाला विचारला. ज्यात त्यांनी ड्राइविंग लायसन्स देण्याच्या नियमांबाबतचा प्रश्न विचारला.  ज्याचं उत्तर सचिनला 7 डिसेंबरला मिळणार आहे.

1 डिसेंबरपासून सचिनला माहिती आणि प्रसारण समितीवर देखील सहभागी करुण घेण्यात आलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.