राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं असा आरोप खुद्द राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळेस त्यांनी भाजपवरही टीका केली. राहुल गांधींनी म्हटलं की ही भाजप राजनिती करतंय आणि हे अस्विकार्य आहे.

Updated: Dec 14, 2015, 11:17 PM IST
राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं असा आरोप खुद्द राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळेस त्यांनी भाजपवरही टीका केली. राहुल गांधींनी म्हटलं की ही भाजप राजनिती करतंय आणि हे अस्विकार्य आहे.

राहुल गांधींनी म्हटलं की जेव्हा मी जेव्हा आसाममध्ये एका मंदिरात जात होतो त्यावेळेस मंदिराजवळ काही आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मला मंदिरात जाण्यापासून रोखलं. त्यांनी माझ्यासमोर एका महिलेला उभं केलं आणि मला आत जाण्यापासून रोखलं. अशा प्रकार भाजप काम करतं. असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

कोल्लममध्ये एका कार्यक्रमात केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना न बोलवल्याने राहुल गांधी यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत हा राज्यातील लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान मोदीही या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. संसद भवन परिसरात राहुल गांधींनी काँग्रेसच्या खासदारांसोबत आंदोलन करत पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.