गाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS

गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो. 

Updated: Sep 25, 2015, 12:19 PM IST
गाईचं शेण अणू बॉम्बला निष्क्रिय करेल - RSS title=

नवी दिल्ली : गो कल्याणासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गोरक्षेसाठी एक आणि महत्त्वाचं कारण सापडलं आहे. गोमूत्राला कँसरपासून दात सुरक्षित ठेवण्याच्या जादूई असरदार गोष्टी नंतर संघाचा एक भाग असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'ने दावा केला आहे की, गाईचं शेण अणू विकिरणच्या धोक्यापासून वाचवू शकतो. 

द हिंदू' या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार या संघटनेने दावा केला की अणू बॉम्बच्या धोक्याला निकाम करण्याची ताकद गाईचं शेणात आहे. या संघटनेद्वारे प्रकाशिक करण्यात आलेल्या एका बुलेटमध्ये लिहिण्यात आले की, कोणत्याही जागेला गाईच्या शेणाने सारवले तर त्या ठिकाणी रेडिओ अॅक्टीव्हीटचा परिणाम होत नाही. परिणाम होत असेल तर अत्यंत कमी प्रमाणत असतो. 

'गाय आणि इस्लाम' शीर्षकात छापण्यात आलेल्या या बुकलेटमध्ये बीफृ-विरोध करण्यात आला आहे. यात काही ऐतिहासिक तथ्यांचा आधार घेत दावा करण्यात आला की भारतात मुस्लिम शासकांननी गोमांसावर बंदी घातली होती. मुगळ बादशहा हुमांयूसह शेवटे मुघल शासक बहादूरशाह जफर यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 

आपल्या वैज्ञानिक दाव्यांच्या आधारावर छापण्यात आलेल्या पुस्तिकेत धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक आधारावर गाय मासांचे सेवक कसे करायला नको हे सांगितले आहे. पुस्तिकेनुसार सर्व धर्मामध्ये बंधुभाव हाच सर्वाच चांगला मार्ग आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.