३ हजार कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त...

डीआरआय विभागाने मुंबई ते उदयपूर आणि उदयपूर ते आखाती देश अशा अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. 

Updated: Nov 2, 2016, 06:54 PM IST
३ हजार कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त... title=

उदयपूर : डीआरआय विभागाने मुंबई ते उदयपूर आणि उदयपूर ते आखाती देश अशा अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. 

एका आठवड्यापूर्वी डीआरआयच्या अधिकाऱ्यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयने मुंबईतून सुभाष दुधानी आणि रवी दुधानी अशा दोन मोठ्या अंमलीपदार्थ तस्करांना पकडले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिका-यांनी उदयपूर येथील तीन कारखान्यात छापा टाकून तब्बल २३.३८ मेट्रिक टन मॅनड्रॅक्स नावाच्या अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. ज्याची बाजारभाव किम्मत तीन हजार कोटी रुपये आहे. 

उदयपूरच्या राजसमंद भागातील श्रीनाथ इंडस्ट्री आणि इतर दोन कारखान्यात मॅनड्रक्स नावाचे अंमलीपदार्थ बनवले जायचे. या कारखान्यातील भिंती मागे भुयार बनवून तेथे अंमलीपदार्थांचा साठा लपवून ठेवला जायचा. 

याची माहिती २८ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या रात्री दिल्ली एअरपोर्टवरुन अटक केलेल्या रवी दुधानी याच्याकडून मिळाली त्यानुसार पोलिसांनी मुंबई एअरपोर्टवरुन या सगळ्या अंमलीपदार्थ तस्करीचा मास्टर माईंड अशोक दुधानी याला अटक केली आणि दोघांची समोरा समोर चौकशी केली असतां उदयपूर येथील ३ हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थसाठ्याची माहिती मिळाली. 

एवढंच नाही तर सुभाष दुधानी हा दुबईत बसून अंमली पदार्थांच्या मोठ्या डील करायचा त्यानुसार सऊदी अरब, साउथ अफ्रीका आणि युरोप येथून सुभाष मॅनड्रक्स या अंमली पदार्थांचे कच्चा माल आयात निर्यात करायचा आणि रवी दुधानी उदयपुर येथील तीन कारखान्यात त्या कच्च्या मालाला मॅनड्रक्सचे अंतिम रुप द्यायचा आणि ते अंमली पदार्थ तो मुंबई, दिल्ली आणि उदयपुर येथून देशात आणि परदेशात तस्कर करायचा ज्या एका ग्रॅम गोळीची किम्मत देशात ५०० रुपये तर परदेशात ३ ते ४ हजार रुपये आहे. 

डीआरआय ने केलेल्या या कारवाईत अनेक मोठ्या कंपन्यांचा सहभाग असून बॉलिवूड कमी काळ काम केलेल्या अनेक बॉलीवूड कलाकारांचा यांत सहभाग असल्याचे डीआरआय सुत्रांनी दिलीये. त्यानुसार आता तपासाचा फेरा वाढवला जाणार आहे.