www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलकाता
प्रत्येक पक्ष आणि नेत्यासाठी `तिकीट` हा शब्द महत्त्वाचा आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना याच तिकीटासाठी १०० रूपये मोजावे लागतील... आणि हे तिकीट आहे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं...
नरेंद्र मोदींच्या सभेसाठी यापुढे १०० रूपयांचे तिकीट ठेवण्यात येणार आहे. जर तुम्हाला ५ फेब्रुवारी रोजी कोलकातामध्ये होणाऱ्या नमोंच्या सभेत पुढे बसायचे असेल तर तिकिटासाठी १०० रुपये मोजावे लागतील. भाजपतर्फे तिकीटांची उपाययोजना करण्यात आली आहे.
ब्रिगेड मैदानावर होणाऱ्या मोदींच्या सभेसाठी पहिल्या काही रांगामध्ये १०० रूपये तिकीट ठेवण्यात आले. आजवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात १०० रूपये आसन व्यवस्थेसाठी तिकीट ठेवण्यात आलं नव्हतं. भाजपच्या दाव्यानुसार या सभेसाठी सात लाख लोक उपस्थित राहणार आहेत. ममता बॅनर्जींच्या सभेपेक्षा मोठी सभा घेण्याचा भाजपचा निर्धार आहे.
या तिकीटांसाठी भाजपकडून ऑनलाईन सुविधा राबवण्यात येत आहे. आता पर्यंत ३००० तिकिटे विकण्यात आली आहेत. पहील्या रांगेतील तिकीटासाठी नरेंद्र मोदींच्या चाहत्यांनी दोन लाखांपर्यंत पैसे दिल्याचे सांगण्यात येत आहे. तिकीटाचे पैसे भरण्यासाठी ऑनलाईन पेमेंटचे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे अगदी कॉर्पोरेट कंपनीसारखं डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डने पेमेंट करता येईल. स्टेजसमोरच्या पहील्या रांगेतील आसन व्यवस्था आरक्षित ठेवली गेली आहेत.
भाजपच्या या पद्धतीने केल्या जाणाऱ्या तिकीट योजनेवर तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांनी टीका केली आहे. पार्थ चॅटर्जींच्या मते तिकीट योजनेमुळे नरेंद्र मोदींना देव-देवतांच्याच रांगेत बसवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाची कॉर्पोरेट कल्चरवर निष्ठा आहे. प्रत्येक गोष्टीचे व्यापारीकरण करणाऱ्या पक्षाने नरेंद्र मोदींचे प्रॉडक्ट बनवले, अशी टीका सीपीएमचे नेते मोहम्मद सलीम यांनी केली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.