नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
आर्थिक विकास खुंटल्याची ओरड होतेय. तसंच अनेक आघाड्यांवर सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही होतेय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात मोठे बदल करू शकतात, असं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलंय.
अरूण जेटली यांची अर्थ मंत्रालयातून उचलबांगडी होऊ शकते. त्यांच्या जागी तरुण मुंबईकर खासदार पियुष गोयल यांची अर्थमंत्रीपदी वर्णी लागू शकते. जेटलींकडे संरक्षण मंत्रालय दिलं जाऊ शकतं.
२०१७ मध्ये उत्तर प्रदेशसह अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात हे बदल होऊ शकतात.
मात्र पक्षाध्यक्ष पदावर अमित शाह हेच कायम राहतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवलीय.