'पुरस्कार वापसी'ची घरवापसी; त्यांनी पुन्हा स्वीकारला पुरस्कार

नवी दिल्ली : दादरीत गोमांसाच्या मुद्द्यावरून झालेल्या अखलाकच्या हत्येनंतर देशभरात 'असहिष्णुते'च्या वादाला तोंड फुटले आणि पुरस्कार वापसीला सुरुवात झाली...

Updated: Jan 22, 2016, 01:59 PM IST
'पुरस्कार वापसी'ची घरवापसी; त्यांनी पुन्हा स्वीकारला पुरस्कार title=

नवी दिल्ली : दादरीत गोमांसाच्या मुद्द्यावरून झालेल्या अखलाकच्या हत्येनंतर देशभरात 'असहिष्णुते'च्या वादाला तोंड फुटले आणि पुरस्कार वापसीला सुरुवात झाली... आता मात्र याच 'पुरस्कार वापसी' झालेली पाहायला मिळाली.

सर्वात प्रथम माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची पुतणी नयनतारा सेहगल यांनी नाराजी दर्शवत आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलेलं पाहायला मिळालं. पण, आता मात्र नयनतारा सेहगलांनी अकादमीला परत केलेला पुरस्कार पुन्हा स्वीकारला आहे.

साहित्य अकादमीत पुरस्कार परत घेण्यासाठी कोणतीही तरतूद नसल्याने पुरस्कार पुन्हा घेत असल्याचा त्यांचा दावा आहे. तर राजस्थानी लेखक नंद भारद्वाज यांनीही 'अकादमीने दिलेल्या उत्तरावर आपण समाधानी असल्यानंच पुरस्कार परत घेत आहोत', असं स्पष्टीकरण देत पुरस्कार पुन्हा स्वीकारलाय.  

नयनतारा सेहगल यांनी अकादमीला एक लाख रुपयांचा चेक परत केला होता; तर भारद्वाज यांनी ५०,००० रुपयांचा... पुरस्कारांसोबत ही रक्कमही त्यांना परत मिळणार आहे.

साहित्य अकादमीने पुरस्कार परत करणाऱ्या ४० जणांना असहिष्णुतेविरोधात केलेल्या ठरावाची प्रत पाठवल्याचे म्हटलंय. लेखक अशोक वाजपेयींनी मात्र पुरस्कार परत घेणार नसल्याचं म्हटलंय.