चेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार

 तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे. 

Updated: Nov 7, 2014, 04:28 PM IST
चेक जमा किंवा क्लिअर झाल्यावर बँक SMS अलर्ट करणार title=

मुंबई :  तुमची बँक तुम्हांला प्रत्येक चेकबाबत SMS पाठविणार आहे. हा पैसे जमा झाल्याबद्दल किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याबद्दल असणार आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने याला कम्पलसरी करण्यात आले आहे. 

या व्यवस्थेतंर्गत तुमच्याद्वारे टाकण्यात आलेला चेक बँकेत जमा झाला, तेव्हा तुम्हांला अलर्ट देणारा एक एसएमएस तुमच्या मोबाईलवर येणार तसेच चेक क्लिअर झाला की दुसरा एसएमएस येणार आहे. यात ज्याने तुम्हांला चेक दिला त्यालाही एसएमएस जाणार आहे. 

रिझर्व बँकेनुसार बँकांमध्ये वाढत असलेल्या फ्रॉडला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यात खातेदारांना माहीत होईल की त्याच्या नावाने काढण्यात आलेला चेक जमा झाला आहे की नाही. त्याने जर चेक दिला नसेल तर तो बँकेला कळवू शकतो आणि चेक थांबवू शकतो. 

रिझर्व बँकेनुसार खातेदाराला योग्य वेळी चेक संदर्भात माहिती झाली तर फ्रॉड होऊ शकत नाही. चेकच्या हँडलिंग आणि प्रोसेसिंग दरम्यान ग्राहकाला अलर्ट पाठविण्यात आला तर धोकेबाजी होऊ शकत नाही. यापूर्वी केवळ क्रेडीट किंवा डेबीट कार्ड धारकांना ही सुविधा मिळत होती. आता काही बँका या सुविधा देत आहेत यात एचडीएफसी ही बँक आहे. ही बँक ग्राहकांना अशा प्रकारे एसएमएस पाठवते. यासाठी दर तीन महिन्यासाठी १७ रुपये चार्ज लावण्यात येतो. 

तसेच रिझर्व बँकेने प्रत्येक चेकची तपासणी अनिवार्य केली आहे. दोन लाखांपेक्षा अधिक रकमेचा चेक अल्ट्रा व्हॉयलेट लँपने स्कॅन करण्यात येणार आहे. ५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या चेकची अनेक पातळीवर तपासणी होणार आहे. यात फ्रॉडची शक्यता कमी होऊन जाते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.