सोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय...

गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय. 

Updated: Jan 10, 2015, 01:26 PM IST
सोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय... title=

मुंबई : गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय. 

यापुढे, सहकारी बँक गोल्ड लोन बुलेट रिपेमेंट स्कीममधून २ लाख रुपयांचं कर्ज देऊ शकतील. उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकारी बँकांना गोल्ड लोन देण्याची परवानगी केवळ १ लाखांवर मर्यादित होती. म्हणजेच, आता आरबीआयनं ही रक्कम दुप्पटीनं वाढवलीय.

आरबीआयच्या अधिसूचनेमध्ये केलेल्या उल्लेखानुसार, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या स्कीममध्ये दिल्या जाणाऱ्या कर्जाची रक्कम १ लाखांवरून वाढवून २ लाखांवर करण्यात आलीय.

कर्जाचा कालावधी कर्ज मंजूर झाल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांहून असता कामा नये. यावर, प्रत्येक महिन्याच्या हिशोबानं व्याज लावलं जाईल. परंतु, हे व्याज मूळ राशीच्या कर्जाचा कालावधी (१२ महिने)
 संपल्यानंतर करावं लागेल. 
 
 बुलेट रिपेमेंट स्कीम दरम्यान बँकांना कर्जाच्या रक्कमेवर 'लोन टू व्हॅल्यू' ७५ टक्के ठेवावं लागतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.